आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्कराेग रुग्णालयामधील बालरोगतज्ज्ञाची अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कर्करोग रुग्णालयातील महिला बालरोगतज्ज्ञ डॉ. साधना जगन्नाथ राऊत (३२, रा. झांबड कॉर्नर, शहानूरमियाँ दर्गा) यांनी ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री जाळून घेतले होते. त्या ८० टक्के भाजल्या होत्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. 


२३ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांचा डॉ. चेरी रॉय (गायकवाड) यांच्यासोबत विवाह झाला हाेता. चार महिन्यांपूर्वी त्यांची कर्करोग रुग्णालयात सहायक प्राध्यापक पदावर पदोन्नती झाल्याने त्या पुण्यावरून शहरात आल्या होत्या. तेव्हापासून त्या झांबड कॉर्नर येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांकडेच राहत होत्या. ९ फेब्रुवारी रोजी साधना यांनी जाळून घेतले. बीड बायपास येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यान जवाहरनगर पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवला होता. 


कौटुंबिक वादाची शक्यता 
साधना यांनी जाळून घेतलेल्या ठिकाणी सुसाइड नोट सापडली नाही. परंतु कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी पतीला फोन केला होता. परंतु त्यांनी उचलला नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी हे पाऊल उचलले असावे. 

बातम्या आणखी आहेत...