आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : शेतात उलटला Beerचा ट्रक; हातात मावत नव्हते एवढे बॉक्स घेऊन पळाले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येथून जवळच असलेल्या आडूळ जवळील पिंपळगाव परिसरात सोमवारी सकाळी ट्रक पलटी झाल्याचे पाहायला मिळाले. पण इतर अपघातांप्रमाणे लोक याठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करताना नव्हे, तर ट्रकमधील सामान पळवताना दिसले. त्याचे कारणच तसे होते हा ट्रक होता बीअरने भरलेला. 


या अपघातानंतर लोकांची बीअर पळवण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. हातात मावेल तेवढे बॉक्स लोकांनी पळवलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काही लोकांनी पोत्यांमध्ये भरून भरून बीअर नेल्या. 


गाड्या थांबवून पळवले बॉक्स 
अपघात पाहण्यासाठी काही लोक थांबले. काहींनी व्हिडिओ शूट केला. तर काही मात्र खास बॉक्स पळवण्यासाठी थांबत होते. रस्त्यावरून जाताना कार थांबवून लोकांनी येथून बीअरचे बॉक्स पळवल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. 


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...