आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी गायिका गिन्नी माहीची उद्या औरंगाबादेत बाइक रॅली, गुरुवारी Live Concert

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबी गायिका गिन्नी माही 12 एप्रिल रोजी औरंगाबादला येत आहे. - Divya Marathi
पंजाबी गायिका गिन्नी माही 12 एप्रिल रोजी औरंगाबादला येत आहे.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित लाइव्ह कॉन्सर्टसाठी पंजाबी परिवर्तनवादी गायिका गिन्नी माही औरंगाबादमध्ये येत आहे. येथील कॅनॉट प्लेसमध्ये गुरुवारी सायंकाळी गिन्नीचे लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. त्याआधी बुधवारी सकाळी गिन्नी माहीची बाइक रॅली होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जयप्रकाश नारनवरे, संतोष दिडवाले, आनंद लोखंडे आणि जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश नवतुरे यांनी केले आहे.

 

बुधवारी बाइक रॅली, विद्यार्थ्यांसोबत संवाद 
- पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या कार्यक्रमाची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारनवरे आणि संतोषकुमार दिडवाले, आनंद लोखंडे यांनी दिली. 
- 11 एप्रिल रोजी गिन्नी माही यांची वाहन रॅली आयोजित करण्यात आली आहे. कॅनॉट प्लेस येथून रॅलीला सुरुवात होईल. क्रांतीचौक मार्गे वाहन रॅली मिलिंद महाविद्यालयात पोहोचेल.  
- मिलिंद महाविद्यालयाला भेट आणि त्यानंतर पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गायिका गिन्नी माही या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील.

 

गुरुवारी लाइव्ह कॉन्सर्ट
- पंजाब प्राइड गिन्नी माही यांचा लाइव्ह कॉन्सर्ट 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता कॅनॉट प्लेस येथे होणार आहे. 
- गिन्नी आपल्या गीतांमधून बाबासाहेबांचे विचार आणि प्रबोधनासोबत जातियवादावर प्रहार करतात. 
- बाइक रॅली आणि लाइव्ह कॉन्सर्टला परिवर्तनवादी, आंबेडकरी नागरिक तरुण, तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयप्रकाश नारनवरे, संतोषकुमार, दिडवाले, आनंद लोखंडे समितीचे अध्यक्ष प्रकाश नवतुरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...