आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना आला होता अदृष्य शक्तींचा अनुभव, \'तेल लावलेल्या पैलवाना\'ची आज घेणार मुलाखत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे आज (21 फेब्रुवारी) शरद पवारांची मुलाखत घेणार आहे. (फाइल) - Divya Marathi
राज ठाकरे आज (21 फेब्रुवारी) शरद पवारांची मुलाखत घेणार आहे. (फाइल)

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर येणार असल्याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. दोन्ही दिग्गज नेते एकाच मंचावर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये शरद पवारांचा अमृतमहोत्सव मुंबईत साजरा झाला होता. यावेळी राज ठाकरे मंचावर नुसते उपस्थित नव्हते तर शरद पवारांच्या अनेक गुणांचे आपल्या खास 'ठाकरी' शैलीत कौतूक केले होते. त्यांचे विविध क्षेत्रातील ज्ञान किती अद्ययावत आहे, याचे उदाहरणही दिले होते. ही एक व्यक्ती एकाचवेळी किती ठिकाणी हजर असते आणि कोण-कोणत्या भूमिका पार पाडते हे बाळासाहेब ठाकरे आणि एस.एम. जोशी यांच्या वादाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले होते. 

 

जागतिक मराठी अकादमीच्या 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे आज प्रकट मुलाखत घेणार आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी पाहिलेले आणि अनुभवलेले शरद पवार कसे आहेत हे DivyaMarathi.Com सांगत आहे. पवारांचा अमृतमहोत्सव आणि 'आधारवड' पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील राज ठाकरे यांच्या भाषणातील काही खास मुद्दे येथे सांगत आहोत.


महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेमागे शरद पवार

- महाराष्ट्रात काहीही घडले तर त्यामागे पवारांचा हात आहे असे म्हटले जाते, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, मी लहान असल्यापासून पवार साहेबांना बघत आलो. जवळून सहवास फार लाभला नाही पण वर्तमानपत्रातून पाहात आलो. 
- महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली, मग ती चांगली-वाईट कोणतीही घटना असली तरी त्यामागे पवारांचा हात असल्याशिवाय ती बातमीच पुढे जात नाही. 
- हे वेगवेगळे हात मी लहानपणापासून पाहात आलो आहे. याचा मलाही अनुभव आला होता... 

 

एसएम आणि बाळासाहेबांमध्ये समझोता
- राज ठाकरे म्हणाले होते, 'आज बाळासाहेब ठाकरे असायला पाहिजे होते. आम्ही सगळे खाली पाहिजे होतो.' 
- कोल्हापूरचा प्रसंग राज ठाकरेंनी यावेळी सांगितला होता. सीमा प्रश्नावरील ती सभा असावी असे राज ठाकरे म्हणाले. 
- 'बाळासाहेबांचे भाषण झाले, पवार साहेबांचे भाषण झाले आणि नंतर एस.एम. जोशींचे भाषण होते. एस.एम. सर यांच्या भाषणातील भूमिका कदाचित बाळासाहेबांना पटली नव्हती. ते ताडकन् उठले, माझा हात धरला आणि आम्ही सर्कीट हाऊसवर निघून आलो.'
- 'थोड्यावेळाने एस.एम. आणि पवार साहेब सर्किट हाऊसवर आले. मला अजूनही आठवते सर्कीट हाऊसच्या लॉनवर तुम्ही तिघे बसला होतात. आणि तिथे एस.एम. आणि बाळासाहेबांमध्ये समझोता घडवून आणला.' 
- हा प्रसंग सांगून राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार हे किती ठिकाणी गेले असतील. आणि कुठे-कुठे त्यांनी काय-काय केले असेल याचा यावरुन अंदाज येतो.' 

 

शरद पवारांचा सल्ला ऐकला... 
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकच आमदार  विजयी झालेला असताना ते स्टेजवर कसे , असा अनेकांना प्रश्न पडला असेल असे सागंत राज ठाकरे म्हणाले होते, 'हे गणित तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विचारा.' 
- शरद पवारांचा सल्ला मी ऐकला आहे, असे सागंत राज ठाकरे यांनी हशा मिळवला होता.
- ते म्हणाले होते, 'एखादा विषय ज्यावेळेला समोर येतो तेव्हा मी विचार करतो की अशा क्षणी बाळासाहेबांनी काय विचार केला असता, पवारसाहेब काय विचार करतील. यातून मार्ग काढत मी पुढे जातो.' 

 

अदृष्य शक्ती...
- राज ठाकरे म्हणाले, 'मी 'मार्मिक'मध्ये व्यंगचित्र काढत होतो. तेव्हा माधव गडकरींनी विचारले की तु 'लोकसत्ता'ला का व्यंगचित्र काढत नाही. तेव्हा मी बाळासाहेबांना विचारले आणि त्यांनी होकार दिल्यानंतर 1986 ते 88 असे दोन वर्षे 'लोकसत्ता'साठी व्यंगचित्र काढले.' 
- 'शरद पवार औरंगाबादमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आले आणि 1988 ला मुख्यमंत्री झाले.' 
- 'तेव्हा मी एक व्यंगचित्र काढले होते. एक मोठा देवमासा काढला होता. त्याच्यावर एक होडी, त्या होडीवर पवार साहेब बसलेले, आणि किनारा आहे. किनाऱ्यावर एक पाटी होती. मुख्यमंत्री. देवमशावर लिहिले होते, काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या....' 
- 'दोन दिवसानंतर दुसरे व्यंगचित्र काढले.. पवार साहेब मुख्यमंत्री झालेले होते. तेव्हा दुसरे व्यंगचित्र येणारच ना... तेव्हा गडकरी म्हणाले, राज... यापुढे आता पवारांवर व्यंगचित्र काढायचे नाही. बरं ते वय असे नव्हते की तेव्हा कळेल की अदृष्य शक्ती काय असते... नंतर-नंतर कळायला लागले अदृष्य शक्ती काय असते!'

 

पवारांचे रॅपिड फायर... 
- राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवारांची एकदा भेट झाली तेव्हा त्यांनी विचारले कुठे होता... मी म्हणालो, माझ्या फार्मवर होतो... 
पुढचा प्रश्न... किती आहे? 
त्यांचा पुढचा प्रश्न... काय लावलं? 
पवारांचे प्रश्न काही थांबत नव्हते. दूध निघावे तसे प्रश्न निघत होते.'
- 'शरद पवारांच्या बाबत एकही असा विषय नाही. की त्याचे उत्तर त्यांच्याकडे नसेल. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. हे सर्व येते कुठून असा प्रश्न पडतो.' 

 

पवारांनी स्तुती केल्यानेही भीती वाटते... 
- 'पवार साहेब खुश झाले की भीती वाटते. मला अनेक लोक सांगतात पवार साहेबांनी तुझी स्तुती केली, तेव्हा भीती वाटायला लागते, अरे बापरे... मी काय केले आता.'

 

तेल लावलेला पैलवान... 
- राज ठाकरे म्हणाले होते, 'पवारांबद्दल अनेक मथळे वाचले आहेत, परंतू सर्वांना परिचीत असलेला मथळा म्हणजे 'तेल लावलेला पैलवान!' हाताला लागत नाही, हाताला सापडत नाही असे पवार साहेब आहेत. एका आजाराच्याही हाती पवार साहेब लागले नाही.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोण होते स्टेजवर आणि प्रेक्षकांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...