आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्यापुढे सगळे समान, संभाजी भिडे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई:आठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कायद्यापुढे सगळे समान असून संभाजी भिडे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

 

ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार प्रा.डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबाद येथे आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना हे वक्तव्य केले. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी सातत्याने भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि दलित संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भिडे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याबाबतचा प्रश्न आठवले यांना विचारला असता त्यांनी भिडे हे दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे म्हटले आहे.