आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकवर मैत्री, भेट झाल्यानंतर उद्यानात जाऊ म्हणाला अन् लॉजवर नेऊन केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर भेटायला बोलावून तरुणाने महिलेवर बलात्कार केला. तिने लग्नाची मागणी करताच नकार देत पोलिसांकडे तक्रार दिली, तर आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेने सिटी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठल खैरनार (रा. हनुमंतगाव, ता. वैजापूर) याच्यावर बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


छावणीतील ३६ वर्षीय महिलेची विठ्ठलसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. विठ्ठलने महिलेला तुला पाहायचे आहे, असे म्हणून भेटण्यासाठी बोलावले. १५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ती मिल कॉर्नर येथे आली. भेट झाल्यानंतर उद्यानात जाऊ, असे म्हणून त्याने तिला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा महिलेने आता माझ्याशी लग्न कर, अशी मागणी करताच अत्याचाराची पोलिसांकडे तक्रार केली तर आत्महत्या करण्याची धमकी दिली. महिलेने २७ एप्रिल रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...