आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार सहाव्या वेतन अायाेगाचा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन अायाेगाचा लाभ द्यावा, हा अाैरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयानेही कायम ठेवला. या अादेशाचा फेरविचार करण्याबाबत राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यामुळे अाता राज्य सरकारला या निवृत्तांना सहाव्या अायाेगानुसार वेतन देणे सक्तीचे झाले अाहे.   


राज्य शासनाने १ जानेवारी २००६ पासून सर्व कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू केला. मात्र १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र त्याचे लाभ लागू केले नव्हते. याबाबत ३० अाॅक्टाेबर २००९ राेजी सरकारने शासन निर्णय काढला हाेता. मात्र ताे कर्मचाऱ्यांत भेदाभेद करणारा आणि घटनाबाह्य असल्याचे सांगत काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी आैरंगाबाद खंडपीठात अॅड. विठ्ठलराव सलगरे यांच्यामार्फत २०११ मध्ये याचिका दाखल केल्या होत्या.  सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर होऊन ९ मे २०१४ रोजी याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला हाेता. तसेच निवृत्तांना थकबाकीची रक्कम ठरावीक मुदतीमध्ये देण्याचे आदेशही सरकारला दिले होते. मात्र राज्य शासनाने खंडपीठाच्या या निर्णयाविरुद्ध २०१५ मध्ये न्यायालयात धाव घेतली हाेती.

बातम्या आणखी आहेत...