आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमपीएससी’त जळगावचा रोहितकुमार राजपूत प्रथम; उपजिल्हाधिकारीपदी निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवेच्या ३७७ पदांसाठी सप्टेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्यातील रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम आला. मागासवर्गीयांतून सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे, तर महिलांमधून पुणे जिल्ह्यातील रोहिणी नऱ्हेने प्रथम क्रमांक पटकावला.


औरंगाबाद जिल्ह्यातील दत्त्ू शेवाळ पाचव्या क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण झाला. या सर्वांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे, तर औरंगाबादच्या सुदर्शन राठोडची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, विक्रीकर अायुक्त यासह गट ‘अ’ संवर्गातील १०४ पदे आणि गट ‘ब’ संवर्गातील २७३ जागांसाठी सप्टेंबर २०१७ मध्ये ही परीक्षा झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...