आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एससी, एसटी लघुउद्योजकांना 10 % भूखंड ठेवणार राखीव;महिला उद्योजकांना कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एससी, एसटी उद्योजकांना राज्यतील कोणत्याही एमअायडीसीत १० टक्के भूखंड राखीव ठेवला आहे. तसेच महिला उद्याेजकांना २५ लाखांहून अधिक कर्ज तत्काळ देण्याची अामची याेजना अाहे. या कर्जाचे ५० टक्के व्याज सरकार भरेल, अशी घाेषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केली.


केंद्र शासनाच्या एससी, एसटी हबच्या वतीने अायाेजित कार्यशाळेत ते बाेलत हाेते. केंद्रीय लघुउद्योग विभागाचे संचालक पी. जी. राव, पी. उदय कुमार, राज्याच्या लघुउद्योग विभागाचे संचालक आर. बी गुप्ते, औरंगाबाद जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक दिलीप गुरुलवार, मोहन झोडे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखी उपस्थित होते. 


देसाई म्हणाले, ‘लघुउद्याेजकांना २० टक्के भूखंड राखीव अाहेत, त्यापैकी १० टक्के एससी, एसटी उद्याेजकांसाठी असतील. राज्य सरकार अशा लघुउद्योजकांकडून २४१ प्रकारच्या वस्तूंची विशेष खरेदी करणार अाहे.

 

तुच्छ वागणूक...

राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकाऱ्यांवर देसाई यांनी टीका केली. ते म्हणाले, महिला किंवा लघुउद्याेजकांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देत नाहीत. विजय मल्ल्या ६ हजार कोटी, आता नीरव मोदी ११ हजार कोटी बुडवून पळाला. ते बँकेला चालते, पण प्रामाणिक लघुउद्योजक चालत नाहीत. केंद्राचे लघुउद्योग संचालक डॉ. जी. एस राव यांनी यात लक्ष घालावे.

बातम्या आणखी आहेत...