आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनमंत्री शहरात असतानाच एसटीच्या मुख्य आगाराला सील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि राज्याचे परिवहन मंत्रिपदही शिवसेनेकडेच आहे. तरीही परिवहनमंत्री दिवाकर रावते शहरात असतानाच मनपाने एसटी महामंडळाच्या मुख्य आगाराला शनिवारी सील ठोकले होते. ४ लाख १५ हजार रुपये मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी ही कारवाई झाली. 

 

दुपारी विभाग नियंत्रक व मनपा उपायुक्तांत चर्चा होऊन सील हटवले. थकबाकीबाबत मनपा- एसटीमध्ये पत्रव्यवहार झाला होता.तरीही शनिवारी कारवाई झाली. परिवहनमंत्री रावते सायंकाळी शहरात येणार होते. त्यांची बदनामी व्हावी म्हणून शिवसेना नेत्याने ही कारवाई करायला लावली, असे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...