आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Senior Journalist And Translator Vidbhau Sadavarte Passes Away

ज्येष्ठ पत्रकार आणि भाषांतरकार विद्याभाऊ सदावर्ते यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ज्येष्ठ पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते (८०) यांचे अल्पशा आजाराने २५ मार्च रोजी औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अजिंठा, लोकमत, देवगिरी तरुण भारत, गावकरी व सांजवार्ता, एकमत या वर्तमानपत्रांमध्ये सदावर्ते यांनी काम केले आहे. त्यांचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होेते. अनेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार, दर्पण पत्रकारिता पुरस्कार, अरविंद वैद्य पुरस्कार, विश्वसंवाद केंद्राचा नारद पुरस्कार आदींचे मानकरी ठरले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला पत्रकारिता, साहित्य, राजकारण आदी क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात आले होते. 


दरम्यान, प्रतापनगर येथे झालेल्या शोकसभेत राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, नागपूरचे माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य, प्रा. रावसाहेब ढवळे, जयंत महाजन, दिव्य मराठीचे वृत्तसंपादक बालाजी सूर्यवंशी, स. सो. खंडाळकर यांनी सदावर्ते यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.