आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धांत फायबर्स जिनिंगला आग; शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव देवी  - भोकरदन-सिल्लोड रोडवरील इब्राहिमपूर शिवारातील सिद्धांत फायबर्स जिनिंग, ऑइल मिलला मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत जिनिंगमधील मशिनरी, कापूस, गठाण जळून खाक झाले आहे. अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली. परंतु,  बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते.

 


जिनिंगला आग लागल्यानंतर नगरसेवक रणवीर देशमुखांसह आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कापूस आणि त्यात वारा असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीबाबतची माहिती मिळताच भोकरदन शहरातील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बंबाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात अाणण्यास अडचणी  येत असल्याने जालना येथील अग्निशमनच्या बंबालाही बोलावले होते. दरम्यान, आग लागून जिनिंग मशिनरी, कापूस गठाण १५०, ४०० टन सरकीची ढेप जळाल्याचे जिनिंग मालक राजेंद्र जैन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...