आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लाेड : शिवन्यात चमकणारे दगड सापडल्याचा दावा; मध्यरात्री हाेताेय लिलाव, विहिरीवर ‘झीराे पाेलिस’ पहारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- सिल्लाेड तालुक्यातील शिवना शिवारातील एक विहीर सध्या चांगलीच चर्चेत अाली अाहे. काैसल्याबाई एकनाथ काळे यांच्या शिवारातील गट क्रमांक ८४४ मध्ये विहिरीसाठी खाेदकाम करण्यात येत हाेते. ३८ ते ४० फुटांपर्यंत खाेदकाम झाल्यानंतर रविवारी (दि.४) अचानक पिवळसर बदामी रंगाचे पाणीदार दगड यात दिसून अाले. 


दगडाचा हा नेमका प्रकार काय? हे साेनं तर नाही ना? याची किंमत काय असे अनेक प्रश्न परिसरात चर्चिले गेले. दगडांविषयी माहिती नसल्याने विहिरीचं काम केलं जात हाेतं त्या शेतमालकाने याकडे दुर्लक्ष केलं. अजिंठ्यातील काही गाइडच्यामते हे अत्यंत दुर्मिळ बहूमुल्य दगड आहेत. काहींनी मग स्वत:च्या साेयीसाठी विहिरीवर ‘झिराे पोलिस’ पहारा सुरू केलाय.

 

माहिती मिळताच अनेकांची धाव 

परिसरात दगडांची कुणकुण लागताच गर्दी अाणि दर्दी दाेघांचेही पाय या शिवाराकडे वळायला सुरू झाले. शासनाची मालमत्ता असलेल्या या स्वामित्व धनाबाबत कुणाला काेनाेकान खबर लागू नये याची दक्षता घेतली जातेय. रात्रीच याचे परस्पर व्यवहार हाेत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये अाहे.

 

चर्चा खात्रीलायक नाही
एका विहिरीमध्ये चमकदार दगड सापडल्याची चर्चा मी एेकली अाहे. पण ही माहिती खात्रीलायक नाही. याबाबत महसूल प्रशासनच अधिक काय ते सांगू शकेल. 
- किरण अाहेर, सहायक पाेलिस निरीक्षक, अजिंठा पाेलिस ठाणे.

 

दगडांना विदेशात मागणी 
विशिष्ट ठिकाणी सापडणाऱ्या पांढऱ्या, लाल, बदामी व पिवळसर रंगांच्या दगडांना व त्यापासून तयार वस्तूंना परदेशात मागणी अाहे. यापासून विविध प्रकारची आभूषणे बनवली जातात. यातील काही दगड जर हिऱ्यासारखे दिसणारे असतील तर त्याची किंमत जास्त असते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, चमकणारे दगड... 

बातम्या आणखी आहेत...