आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय इज्तेमाला परवानगी नाकारली; पाेलिस म्हणतात... बंदोबस्त देणे अशक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो... - Divya Marathi
सांकेतिक फोटो...

औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे २४ ते २६ फेब्रुवारी असे तीन दिवस होणाऱ्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी लाखो लोक येणार अाहेत. मात्र एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदोबस्त देता येणार नसल्याचे सांगत पोलिसांनी या इज्तेमाला परवानगी नाकारली आहे. तसे पत्रच वाळूजचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार टाक यांनी  लिंबेजळगावचे सरपंच सय्यद अनिस आमिर पटेल यांना बुधवारी दिले आहे.


या इज्तेमाची गेल्या तीन महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू आहे. इज्तेमाच्या आयोजकांनी ३० ते ३५ लाख लोक येेतील  असे गृहीत धरून व्यवस्थाही केली आहे. मात्र आयोजनाविषयी पोलिसांना कोणताही कल्पना न देताच ही तयारी सुरू केल्याने वाळूज पोलिसांनी स्वत:हून इज्तेमाच्या आयोजकांना पत्र लिहून परवानगी नाकारल्याचे कळवले आहे.


या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येणार असल्याने त्याचे व्यवस्थापन आणि वाहतूक नियमनासाठी  पोलिस आणि अन्य विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते, तशी ती घेतलेली नाही. ऐनवेळी येणाऱ्या जमावाचे व्यवस्थापन, वाहतूक नियमन व संरक्षणाची व्यवस्था करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळे  इज्तेमासाठी परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र पोलिसांनी स्वत:होऊनच आयोजकांना दिले. त्याचबरोबर अशा आयोजनासाठी किमान तीन महिने आधी परवानगी घेण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पूर्तता करण्यात आल्याचे सांगून शुक्रवारी पोलिसांकडून परवानगीचे पत्र मिळेल, अशी आशा लिंबेजळगावचे सरपंच पटेल यांनी व्यक्त केला आहे. वाळूज पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या पत्रात इज्तेमाच्या आयोजनासाठी निधीचे व्यवस्थापन कसे केले?  त्याबाबत  संबंधित विभागास कळवले आहे का? अशी विचारणाही केली आहे. 


परवानगी मागितली की नाही पोलिसांतच घोळ

इज्तेमाच्या आयोजकांनी पोलिसांकडे  परवानगी मागितली की नाही, याबाबत पोलिसांतच एकवाक्यता नाही. वाळूजचे पोलिस निरीक्षक टाक यांनी आम्हाला परवानगीच मागितली नसल्याचे सांगितले. तर पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी आयोजकांनी ऐनवेळी कल्पना दिल्याचे म्हटले आहे. 

 

ऐनवेळी कल्पना दिली
इस्तेमा आयोजकांनी आम्हाला ऐनवेळी राज्यस्तरीय कार्यक्रमाविषयी कल्पना दिली. लाखोंचा जनसमुदाय येत असताना आम्हाला काही दिवसांत बंदोबस्त देणे अशक्य आहे. त्यांनी इतर विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतली आहेत किंवा नाहीत, हेही पोलिसांना कळवले नाही. त्यामुळे आम्ही तूर्तास त्यांना परवानगी दिलेली नाही. हा निर्णय अंतिम नाही.
-विनायक ढाकणे, पोलिस उपायुक्त.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...