आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त २० कोटींची करवसुली, यापुढे मुदतवाढ नाही : घाेडेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- थकीत मालमत्ता करावर दंड व शास्ती लागत असल्याने नागरिक कर भरत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता करासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. त्यात विलंब शुल्क, दंडाच्या रकमेवर तब्बल ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. एप्रिल व मे अशा दोन महिन्यांच्या या योजनेच्या कालावधीत फक्त २० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. गतवर्षी कोणतीही योजना नसताना हा आकडा १६ कोटींच्या आसपास होता. म्हणजेच ही योजना अयशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. नागरिक सवलत देऊनही जर कर भरत नसतील तर यापुढे या योजनेस मुदतवाढ न देता आता थेट कारवाई सुरू करणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 


मालमत्ता करासाठी अभय योजना असावी यासाठी घोडेलेच आग्रही होते. राज्य शासनाने अजून मान्यताही दिली नसताना त्यांनी १ एप्रिलपासून याच्या अंमलबजावणीची घोषणा केली आणि प्रत्यक्षात ती सुरूही झाली. या दोन महिन्यांच्या कालावधीत ज्यांना दंड व विलंब शुल्क म्हणून १२० कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे, असे नागरिक पुढे येतील. म्हणजेच किमान ८० कोटी रुपये ते आणि त्यांचा थकीत कर असे मिळून २०० कोटी रुपये तरी तिजोरीत येतील असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याच्या १० टक्केच रक्कम तिजोरीत आली. अर्थात यात नियमित कर भरणाऱ्यांचीच संख्या जास्त असणार हे नक्की आहे. 


आता भय निर्माण करू 
आमचे प्रयत्न प्रामाणिक होते. परंतु नागरिकांनी याचा लाभ घेतला नाही. आता मुदतवाढीची मागणी होतेय. ज्यांनी दोन महिन्यांत याचा फायदा घेतला नाही ते यापुढे याचा फायदा घेतील हे कशावरून? त्यामुळे अाता अभय नाही, फक्त भय निर्माण करू. 
- नंदकुमार घोडेले, महापौर. 

बातम्या आणखी आहेत...