आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उष्णतेची लाट; औरंगाबाद प्रथमच ४१.६ अंशांवर; चंद्रपूर, अकोल्यात सर्वोच्च ४५ अंश सेल्सियसची नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाडा, विदर्भ, खान्देशात उष्णतेची लाट आली आहे. शनिवारी राज्यात चंद्रपूर ४५.२ आणि अकोल्यात ४५.० अंश सेल्सियस सर्वाधिक तापमानाची नोंद घेण्यात आली. त्याखालोखाल नागपूर, परभणी, नांदेड, अमरावती, जळगाव शहराचे तापमान ४४ अंशांवर होते. औरंगाबादचे तापमान प्रथमच ४१.६ अंशांवर जाऊन उच्चांकी पातळी गाठल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील मान्सूनपर्यंतचे दिवस अतिउष्णच राहणार असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 


मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस व गारपीट झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा सूर्य आग ओकायला लागला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात शुक्रवारी प्रथमच शहराचे तापमान ४०.४ अंशांवर गेले होते. शनिवारी कमाल तापमानात १.२ अंशांनी वाढ होऊन ते ४१.६ तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सियसवरून थेट चार अंशांनी वाढून २८.५ अंशांवर जाऊन यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च पातळी गाठली. अकोला, चंद्रपूर, नागपूर, परभणी, नांदेड, जळगाव शहराचे तापमान ४४ ते ४५.२ अंश म्हणजे सर्वाधिक आहे. पुणे, नाशिक, सांगली, सातारा शहराचे तापमान ३९.६ ते ४० अंशांदरम्यान होते. सोलापूर ४२, अहमदनगर ४३.७ अंश आहे. कमाल व किमान दोन्ही तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

 

येथे तापमान कमी 
मुंबई, महाबळेश्वर, रत्नागिरी शहराचे कमाल तापमान ३३ अंश तर किमान २२ ते २५ अंश सेल्सियसदरम्यान आहे. 

बातम्या आणखी आहेत...