आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग जलवाहिनीवर ताण, मागणी 100 एमएलडी, क्षमता फक्त ७२ची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ७२ एमएलडीच्या पाइपलाइनवर प्रचंड ताण येत असून अत्यंत स्वस्त दरात मिळणाऱ्या शुद्ध पाण्यावर सर्वांचा डोळा आहे. हे पाणी फक्त उद्योगासाठी राखीव असतानाही इतर कामांसह नागरी वसाहती, टॅकर ला अगदी नगण्य भावात दिले जाते परिणामी एमआयडीसी तोट्यात आहे. पाच हजार लिटरचा टँकर फक्त ८० रुपयांत मिळतो. उद्योगांना १६ रुपयांत एक हजार लिटर, या दराने पाण्याची विक्री केली जाते, तर घरगुती वापरासाठी ८.७५ रुपयांत एक हजार लिटर पाणी मिळते. ग्रामपंचायतींना एक हजार लिटर पाण्यासाठी अडीच ते साडेचार रुपये एवढा अल्पदर आकारला जातो.


जायकवाडी धरणातून महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ(एमआयडीसीने उद्योग क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी ७२ एमएलडी क्षमतेच्या पाइपलाइनची निर्मिती केली खरी; पण वाळूज, स्टेशन एमआयडीसी, चिकलठाणा, शेंद्रा, जालना आणि वाळूजमधील १३ ग्रामपंचायतींना आणि आता डीएमआयसी शेंद्राला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. शिवाय नागरी वसाहतीसाठी मनपा पाणी मागत आहे. त्यामुळे या पाइपलाइनवर मोठा ताण येत आहे.
दररोज १८० टँकर मागणी


७२ एमएलडीच्या पाइपलाइनमध्ून ७६ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात १०० एमएलडीची मागणी या पाईपलाईकडे आली आहे त्यामुळे या पाइपलाइनवर प्रचंड ताण येत आहे.कमी पैशात पाणी देणाऱ्या एमआयडीसीला मात्र तोट्यात ही यंत्रणा चालवावी लागत आहे. टँकर लॉबीदेखील एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून राहते. वाळूज आणि शेंद्रा येथील प्रत्येकी चार पाॅइंटमधून दिवसाकाठी १८० टँकर भरले जातात.

 

मद्यनिर्मितीसाठी पाच एमएलडी पाणी
औरंगाबादेत मद्य, बिअरनिर्मितीचेे ९ कारखाने आहेत. या कारखान्यांना सध्या दररोज ५० लाख लिटर अर्थात ५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.त्यासाठी एमआयडीसीकडून प्रति हजार लिटरसाठी फक्त  सोळा रुपये आकारले जातात.

 

खर्च पाच कोटींचा,  कमाई अडीच कोटी
महावितरणचे वीज बिल, जलसंपदा विभाग पाणीपट्टी तसेच जलवाहिनीची देखभाल व दुरुस्ती यासाठी ‘एमआयडीसी’ ला दरमहा पाच कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्या तुलनेत पाणीपट्टीतून दरमहा अडीच कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळत आहे.

 

खर्च पाच कोटीचा, कमाई २.५ कोटी
महावितरणचे वीज बिल, जलसंपदा विभाग पाणीपट्टी  तसेच जलवाहिनीची देखभाल व दुरुस्ती यासाठी ‘एमआयडीसी’ ला दरमहा पाच कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यातुलनेत पाणीपट्टीतून दरमहा अडीच कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळत आहे.

 

११९ कि.मी.जलवाहिनी
‘एमआयडीसी’ची जायकवाडी ते जालना ही जलवाहिनी तब्बल ११९ कि.मी. लांबीची आहे. ही जलवाहिनी आता जुनी झाली असून, पुरेशा क्षमतेने पाण्याचे वहन करू शकत नाही. दररोज होणाऱ्या पाण्याच्या उपशापैकी निम्मे पाणी पिण्याची गरज भागविण्यासाठी द्यावे लागते. वाळूज औद्योगिक वसाहतीला २४ तास पाण्याचा पुरवठा केला जात असला, तरी  चिकलठाणा व  शेंद्रा औद्योगिक वसाहतींना पुरेसे पाणी देता येत नाही.

 

जालना : हवे ८ एमएलडी, मिळते २ एमएलडी पाणी...
वाळूज ‘एमआयडीसी’ला २४ तास पाणीपुरवठा केला जातो, मात्र जलवाहिनी पूर्ण क्षमतेने पाण्याचे वाहू शकत नसल्याने शेंद्रा, चिकलठाण्यात वेळापत्रक ठरवून दिले आहे. जालना वसाहतीची मागणी ८ एमएलडीची असताना प्रत्यक्षात २ एमएलडीच पाणी पुरविले जाते.

 

‘एमआयडीसी’कडून  दिले जाणारे पाणी
* जलवाहिनीची क्षमता ७२ एमएलडी
* दररोजचा उपसा ७६ एमएलडी
* वाळूज एमआयडीसी १९ एमएलडी
* सिडको वाळूज महानगर ५ एमएलडी
* रेल्वेस्थानक वसाहत २ एमएलडी
* चिकलठाणा वसाहत ८ एमएलडी
* शेंद्रा वसाहत ८ एमएलडी
* जालना वसाहत २  एमएलडी
* १३ ग्रामपंचायती २७ एमएलडी
* शासकीय टँकर ३ एमएलडी

 

बातम्या आणखी आहेत...