आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाखांच्या रेडिमेड कपड्यांची सातपूरला चाेरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापून मारला डल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- सातपूर काॅलनीतील आनंद छाया परिसरातील एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानावर शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारून राेख रकमेसह सुमारे अडीच लाख रुपयांचे रेडिमेड कपडे लंपास केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चाेरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापून चाेरी केली. 


मौले कॉम्प्लेक्समध्ये के. टी. कलेक्शन नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता दुकानाचे मालक भूषण थोरात यांनी दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उघडण्यासाठी आले असता, कुलूप न तोडता दुकानाचे शटर वाकलेले दिसले. दुकानात शिरले असता दुकानातील सर्व रेडिमेड कपड्यांसह तिजोरीतील २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापून चोरी केल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज बघितले असता चोरट्यांचा अस्पष्ट चेहरा दिसून येत आहे. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले अाहेत. या घटनेने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...