आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉनच्या हजारो कर्मचाऱ्यांना सक्तीची सुटी;कारण स्पष्ट नसल्याने कर्मचारी अस्वस्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- व्हिडिओकॉनच्या चितेगाव प्रकल्पातील शेकडो कर्मचाऱ्यांना ८ जानेवारीपासून १२ दिवसांची सक्तीची  सुटी जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सुट्या  नेमक्या कशासाठी दिल्या याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती, शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे प्रमुख, खासदार राजकुमार धूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला विषयावर काहीही बोलायचे नाही, असे म्हटले.


चितेगावातील व्हॅल्यू रेफ-१ व सोकेश-२ या युनिटमध्ये फ्रिज तसेच वॉशिंग मशीन, मोबाइल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची निर्मिती केली जाते. येथे  ६ हजार ४५९ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच नवीन वर्ष आगमनाचे कारण सांगून २८ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१८ पर्यंत सुट्या देण्यात आल्या होत्या. ७ जानेवारी रोजी प्रत्येक युनिटमध्ये नोटीस लावून ८ ते १८ जानेवारी सुटी जाहीर करण्यात आली.


एवढी प्रदीर्घ सुटी सर्वांना देण्यामागचे नेमके कारण काय, याचा कोणताही उल्लेख नोटिसीत नाही. या सुट्यांचा पगार मिळणार का, अशी विचारणा काही कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांकडे केली तेव्हा काहीही उत्तर मिळाले नाही.


कच्च्या मालाचे कारण
कर्मचाऱ्यांनी या सक्तीच्या सुटीबाबत विचारल्यावर व्यवस्थापनाने उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध नसल्याने सुटी देण्यात आल्याचे सांगून या सुट्या पुढील काळात भरून काढल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...