आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राकडून मैत्रिणीचेच ब्लॅकमेलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकेकाळी चांगले मित्र-मैत्रिणी असताना ते भेटत होते. मुलाने भेटीदरम्यानचे मुलीचे फोटो काढले. त्यानंतर बाहेर भेटण्यासाठी आली नाहीस तर ते फोटो तुझ्या वडिलांना पाठवून देईन, सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. मुलीने कंटाळून मोबाइल बंद केला तर आरोपी तरुणाने तिच्या चुलत बहिणीचा मोबाइल क्रमांक मिळवून तिलाही त्रास देण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. महेश नाटेकर (रा. राजाबाजार) असे आरोपीचे नाव असून जवाहरनगर पोलिसांनी त्याला अटक करून जामिनावर सुटका केली. 


गारखेडा परिसरात राहणारी एकवीसवर्षीय मुलगी व महेशची दोन वर्षांपासून ओळख होती. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीही झाली होती. यामुळे दोघे मध्यंतरी एकमेकांना भेटायचे. या भेटीदरम्यान महेशने मुलीचे फोटो काढले. मैत्री झालेली असल्याने मुलीला त्याच्यावर कुठलाही संशय आला नाही, परंतु महेशने नंतर तिला अनेकदा बाहेर भेटण्यासाठी येण्याचा हट्ट सुरू केला. भेटण्यासाठी आली नाहीस तर काढलेले फोटो तुझ्या वडिलांना पाठवून देईन, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर फोटो व्हायरल करून बदनामी करीन, अशी धमकी दिली. त्रासलेल्या मुलीने १६ जानेवारी रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात जाऊन महेशविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक करून नंतर जामिनावर त्याची सुटका केली. जमादार दीपक सोनवणे पुढील तपास करत आहेत. 


मुलीने माेबाइल बंद केल्यावर चुलत बहिणीला फाेटाे पाठवून दिला त्रास 
बाहेर भेटायला ये, नाही तर फोटो वडिलांना पाठवीन, व्हायरल करीन, या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने मोबाइल बंद केला. तेव्हा महेशने तरुणीच्या फेसबुक अकाउंटवरून तिच्या चुलत बहिणीचा मोबाइल क्रमांक मिळवला. तिलाही तरुणीचे वारंवार फोटो आणि मेसेज पाठवून त्रास सुरू केला. तेव्हा महेशचा प्रकार समोर आला. 

बातम्या आणखी आहेत...