आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रिपलसीट जाणाऱ्यांना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचाही जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- औरंगाबाद-मुंबई महामार्गावर लासूरच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. खोजेवाडी-सिंधी सिरजगावदरम्यान असणाऱ्या नदीवरील पुलाजवळ शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. साहेबराव चांगदेव शेजूळ, मनोहर आंबादास काळे, बाळू दामोदर नेटके (तिघेही रा. लासूरगाव) अशी मृतांची नावे आहेत. 


हे तिघे शुक्रवारी रात्री स्प्लेंडरवरून (एमएच २० बीजी १५७) औरंगाबादहून लासूर गावाला जात होते. खोजेवाडी-सिंधी सिरजगावदरम्यान असणाऱ्या नदीवरील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने उडवले. धडकेने तिघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यातच गंभीर जखमी होऊन तिघेही जागीच गतप्राण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडून होते, अशी माहिती सिंधी सिरजगावचे उपसरपंच प्रदीप सोनवणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...