आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडकाफडकी पालकमंत्रिपद गेल्यानंतर रामदास कदम म्हणाले -खैरे हीरो की झीरो काळच ठरवेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माझे पालकमंत्रिपद कशामुळे गेले हे तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी पक्षादेश महत्त्वाचा. खासदार चंद्रकांत खैरे हीरो की झीरो हे काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी दिली. 


गुरुवारी दुपारी कदम यांच्याशी संपर्क साधला असता, पालकमंत्रिपद कशामुळे गेले, यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही, असे ते म्हणाले. तुमचे पद गेल्याने इकडे खैरे हीरो झाले आहेत, असे सांगताच खैरे हीरो की झीरो हे नंतर ठरेल, असे सांगत त्यांनी विषय संपवला. कदम यांचे पालकमंत्रिपद गेले असले तरी नांदेडला जाताना औरंगाबादहूनच जावे लागते. त्यामुळे कदम हे जिल्ह्यातील राजकारणात हस्तक्षेप करणार नाहीत, असे मुळीच नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी खासगीत बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...