आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय सलोखा राखून दोन्ही समाजात समन्वय साधणार; पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद रुजू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीने दोन समाजात मोठी दरी निर्माण झाली आहे. आगामी काळात शहरात जातीय सलोखा राखून दोन्ही समाजात समन्वय साधणार असल्याचे नूतन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. मंगळवारी त्यांनी पदभार घेतला. 


गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलिस आयुक्त पदावर चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी नियुक्तीचे आदेश मिळाल्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिरंजीव प्रसाद पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. या वेळी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली घाटे-घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, नागनाथ कोडे, सी.डी. शेवगण आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चिरंजीव प्रसाद यांनी प्रभारी आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून पदभार स्वीकारला. 


या वेळी पत्रकारांशी बोलताना प्रसाद म्हणाले, शहरात जातीय सलोखा राखणे, गुन्ह्यांचा तपास गतीने करून आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवणे आणि पोलिस कल्याण निधीचा योग्य वापर करून त्याचा लाभ पोलिस कर्मचाऱ्यांना मिळवून देणे ही आपली प्राथमिक उद्दिष्टे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...