आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये पगारीया ऑटोसमोर पूर्ववैमस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने जालना रोडवरील सेव्हन हिल परिसरात तणाव निर्माण झाला होता. पगारीया ऑटोजवळ दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पुंडलिक नगर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून जमावाला पांगवले.

 

सूत्रांनुसार, जिन्सी आणि बायजी पुऱ्यातील दोन गटांत पूर्ववैमस्यातून ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. जिन्सी भागातील दोघे रिक्षाच्या सर्व्हिसिंगसाठी सेव्हन हिल परिसरातील मोतीवाला कॉम्प्लेक्समधील पगारीया ऑटोमध्ये आले होते. त्याचवेळी बायजीपुर्‍यातील दोन बाऊन्सर काही कामानिमित्त तिथे आले. दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांना पाहिले. नंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. चकमकीचे रूपांतर क्षणात तुंबळ हाणामारीत झाले. हाणामारीत एकाचे डोके फुटले, दुसर्‍याच्या बोटाला गंभीर दुखापत होवून तो रक्तबंबाळ झाला.

 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवली. हारामारी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... तुंबळ हाणामारीचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...