आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आज उस्ताद झाकीर हुसेन यांचे सोलो तबलावादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्वरझंकार, पुणे आणि 'दिव्य मराठी' यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादेत प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या सोलो तबलावादनाचा कार्यक्रम रंगणार आहे. २१ जानेवारी रोजी प्रोझोन मॉलच्या लॉन्सवर सायंकाळी ही मैफल होईल. हुसेन यांच्या जादुई बोटांची सुरेल किमया ऐकण्याची अनोखी संधी रसिकांना यानिमित्त मिळणार आहे. 


या मैफलीत 'व्हायोलिन -अ व्हर्सटाइल इन्स्ट्रुमेंट' हा कार्यक्रम ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार सादर करणार आहेत. त्यांना मराठवाड्यातील नामांकित तबलावादक पंडित मुकेश जाधव साथसंगत करतील. त्यानंतर उस्ताद झाकीर हुसेन यांचे सोलो तबलावादन होईल. त्यांना सारंगीवर दिलशाद खान साथसंगत करणार आहेत. स्वरझंकार आणि 'दिव्य मराठी'ने भारतातील दिग्गज कलाकारांच्या गायन-वादनाची पर्वणी औरंगाबादकरांना दिली आहे. यंदा या कार्यक्रमाचे आयोजन प्रोझोन मॉलच्या सहयोगाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक धूत ट्रान्समिशन प्रा.लिमिटेड हे आहेत. सहप्रायोजक वामन हरी पेठे ज्वेलर्स असून विशेष साहाय्य रिलायन्स डिजिटल यांचे आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका Book My Show वेबसाइटवर उपलब्ध आहेत. तसेच संत एकनाथ रंगमंदिर, सावरकर चौकातील वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि कॅनॉट प्लेस सिडको येथील जॉइंट कॅफेमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.