आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्राकडून आलेले बाष्पयुक्त ढग उत्तरेकडील थंड वाऱ्याला भिडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमिनीहून ९०० मी. उंचीवरील  ढगामुळे वाढला गारांचा आकार - Divya Marathi
जमिनीहून ९०० मी. उंचीवरील ढगामुळे वाढला गारांचा आकार

औरंगाबाद- अरबी समुद्रावरून बाष्प घेऊन येणारे ढग जालन्याजवळ विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील आकाशात उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांना भिडल्याने रविवारी जालना, बुलडाणा, वाशीम, अकोला भागात गारपीट झाली. मंठा परिसरात हे ढग जमिनीपासून केवळ ९०० मीटर उंचीवर असल्याने गारांचा आकार वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 


हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, गेल्या आठवड्यापासून हिंदी महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान २९ ते ३१ अंशांपर्यंत वाढले. ते सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी जास्त आहे. पाण्याचे जास्त बाष्पीभवन होऊन अरबी समुद्रावर ढगनिर्मितीस चालना मिळाली. त्यातच १० फेब्रुवारीला द. महाराष्ट्र, लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याकडे हे ढग खेचले गेले. जालना जिल्ह्यात त्यांचा संपर्क उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांशी आला. ढगातील बाष्पाचे घनीभवन होऊन गारपीट झाली. 

बातम्या आणखी आहेत...