आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉनमध्ये सर्वकाही सुरळीत, लवकरच नव्या जोमाने सुरु होणार कारखाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चितेगाव येथील व्हिडिओकॉन प्रकल्पामध्ये सर्वकाही सुरळीत असून 22  जानेवारीला नव्या जोमाने कारखाना सुरु होणार आहे. कच्चामालाची कमतरता असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्या देण्यात आल्याचे व्हिडिओकॉनचे संचालक प्रदीप धूत यांनी DivyaMarathi.Com सोबत बोलताना सांगितले आहे. 

 

16 जानेवारीपासून कर्मचारी कामावर परत 

- चितेगाव येथील व्हिडिओकॉन कंपनीमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाइल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची निर्मिती केली जाते. येथे 6 हजार 459 कर्मचारी कार्यरत आहेत. येथील कर्मचाऱ्यांना नवीन वर्ष आगमनाचे कारण सांगून 28 डिसेंबर ते 5 जानेवारी 2018 पर्यंत सुटी देण्यात आली होती. 
- प्रदीप धूत यांनी सांगितले, की सुटीवर पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने कामावर परत बोलवले जात आहे. धूत म्हणाले, 'ज्या देशांतून कच्चा माल येतो तिथे नाताळाच्या सुट्या असल्याने कच्चा मालाचा पुरवठा कमी झाला होता. 16 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कामवर परत बोलावले जाणार आहे.'
- औरंगाबाद हे आमचे गाव आहे, असे सांगत धूत म्हणाले येथील कारखाना येत्या काही दिवसांमध्ये नव्या जोमाने सुरु झालेला सर्वांना पाहायला मिळेल. व्यवस्थापनावर सर्वांनी विश्वास ठेवावा.

- धूत म्हणाले, 'व्हिडिओकॉनने आजपर्यंत कधीही कर्मचाऱ्यांचा पगार थकवलेला नाही, यापुढेही तसे होणार नाही.'

 

खासदार धूत यांचे काम सामाजिक आणि राजकीय

- खासदार राजकुमार धूत यांचा व्हिडिओकॉन कंपनीशी सध्या काहीही संबंध नसल्याचे प्रदीप धूत यांनी सांगितले. मीडियामध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार धूत आणि व्हिडिओकॉनसंबंधीच्या काही बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या असल्याचे ते म्हणाले.  

 - खासदार धूत यांनी 1998 मध्ये व्हिडिओकॉन संचालक पद सोडले आहे. त्यांचे काम हे सामाजिक आणि राजकीय आहे.
 - त्यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपातून ते निर्दोष सुटले असल्याचेही प्रदीप धूत यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...