आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YouTube पाहून तयार केले Eggless केक, मागणी एवढी वाढली सुरु केला कारखाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला उद्योजक अंकिता भालेराव. - Divya Marathi
महिला उद्योजक अंकिता भालेराव.

औरंगाबाद - शुन्यातून उद्योग उभा करुन अंकिता भालेराव या तरुणीने बेरोजगारांसमोर आदर्श उभा केला आहे. बीए द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण, उद्योगाचे कोणतेही शास्त्रशुद्ध ज्ञान नाही. बँकांनी अर्थपुरवठा करण्यास दिलेला नकार. अशी प्रतिकुल परिस्थिती असताना फक्त इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर अंकिता यांनी घरगुती केक उद्योगाचा आज कारखान उभा केला आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने औरंगाबादच्या या यशस्वी उद्योजिकेची कहाणी खास DivyaMarathi.Com च्या वाचकांसाठी. 

 

युट्यूब व्हिडिओ पाहून तयार केले केक 

प्रतिकुल परिस्थितीत 10वी पर्यंत शिक्षण घेऊन नोकरी करुन तीन बहिणींसह आई-वडील असे पाच जणांचे कुटुंब अंकिता चालवत होत्या. औरंगाबादमधील कौस्तुभ भालेराव यांच्यासोबत लग्न करुन मुंबईच्या अंकिता औरंगाबादमध्ये आल्या. मुंबईची तरुणी औरंगाबादमध्ये लवकरच रुळली. परंतू त्यांच्यातील उद्योगी स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता.

 

कुटुंबीय आणि शेजारी, नातेवाईक यांना बेकरीचे पदार्थ आवडत नव्हते, यातून अंकिता यांनी घरगुती पातळीवर केक तयार करण्याचा निर्णय घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही प्रशिक्षण न घेता फक्त युट्यूब व्हिडिओ पाहून अंकिता यांनी केक तयार करण्याचे तंत्र अवगत केल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.  त्यातही Eggless केक तयार करुन देत असल्यामुळे अंकिता यांच्या 'ओम केक'ची माऊथ पब्लिसिटी वाढली.  रोजच्या पाच ते दहा केकच्या ऑर्डर नियमीत सुरु झाल्या. वयाच्या 27व्या वर्षी अंकिता यांनी पती, सासू-सासरे, एक मुलगा असे कुटुंब सांभाळून ओम केकचा कारभार वाढवत नेला.  

 

चार वर्षात 15 लाखांपर्यंत नेला उद्योग
- सिडकोतील एन-1 येथे राहाणाऱ्या अंकिता 2 वर्षे घरातच केक तयार करुन औरंगाबादमधील विविध स्टोअरमध्ये डिलिव्हरी करत होत्या. 
- आजे सासरे परशुराम पुरुषोत्तम भालेराव आणि सासरे निलकंठ भालेराव यांनी सुनेचा उत्साह पाहुन त्यांना एमआयडीसी चिकलठाणा येथे उद्योग उभा करुन देण्याचा निर्धार केला. त्यासाठी जागा मिळाली, मात्र मशिनरीसाठी फंड्स उभा करताना दमछाक झाली. 

- अंकिता यांनी सांगितले, की आजे सासरे परशुराम हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांनीच उद्योगाची प्रेरणा दिली. कुटुंबातील सदस्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योग उभा करावा यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. 

 

मुद्रा योजनेतून मिळाले नाही कर्ज 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेंतर्गत अनेक बँकांमध्ये अंकिता यांनी अर्ज केला, मात्र एकाही बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे अंकिता यांनी सांगितले. 
- बँक लोन देत नाही हे कळाल्यानंतर अंकिता निराश झाल्या होत्या. उद्योग मोठा करण्याचे त्यांचे स्वप्न, स्वप्नच राहाते की काय अशी चिंता त्यांना सतावू लागली होती. 

- नोकरी करायची नाही! करायचा तर उद्योगच. असा सासरे निलकंठ भालेराव यांचा दंडक होता. त्यामुळे अंकिता यांनी निराशा झटकली. 
- याकाळात सासऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी दोन लाख रुपये पर्सनल लोन घेतले आणि ओम केकसाठीची मशिनरीज खरेदी केली.
- सासरे निलकंठ भालेराव यांचा औरंगाबाद शहरात असलेला परिचय आणि मार्केटिंगचे तंत्र अवगत असल्यामुळे लवकरच केकची मागणी वाढू लागली. 

 

घरगुती केकच्या ऑर्डर ते कार्पोरेट हाऊसमध्येही मागणी
- अवघ्या 3-4 वर्षांत अंकिता यांचा उद्योग 15 लाखांपर्यंत पोहोचला आहे. आज त्यांच्या ओम केक कंपनीमध्ये अर्धा किलो ते 30 किलो पर्यंतचे केक तयार होतात. 
- शहरातील अनेक कार्पोरेट हाऊस त्यांचे ग्राहक आहे. 
- अंकिता या 15 प्रकारच्या केकसोबतच लादी पाव, चोको लाव्हा, 15 प्रकारच्या कुकीज, 8 प्रकारच्या खारी, चार प्रकारचे पिझ्झाबेस तयार करतात. 

 

10वीनंतर झाले लग्न, युट्यूब व्हिडिओ पाहून केकचे प्रशिक्षण 
- अंकिता यांनी सांगितले, पती कौस्तुभ, सासरे भालेराव, सासू  यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळे स्वतंत्र उद्योग उभा करणे शक्य झाले आहे.

- अंकिता यांचे 10 वीपर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. घरात तीन बहीणी आणि आई-वडील असे पाच जणांचे कुटुंब होते. अंकिता यांनी शिक्षण सोडले आणि नोकरी करु लागल्या. 

- कौस्तूभ भालेराव यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर अंकिता यांनी पुन्हा शिक्षण सुरु केले आणि त्यांनी बी.ए. द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले.  

- बेकरी उद्योग सुरु करण्यापूर्वी या क्षेत्रातील कोणताही अनुभव नव्हता किंवा त्याचे प्रशिक्षणही घेतलेले नव्हते, असे अंकिता यांनी सांगितले. केके कसा तयार करतात याचे युट्यूबवरील व्हिडिओ  पाहिले आणि घरगुती पातळीवर केक तयार करण्यास सुरुवात केली.  

- उद्योग सुरु करायचा तर त्यात तडजोड चालणार नाही. ग्राहकांचे समाधान झाले पाहिजे. केकच्या चवीसोबत तडजोड नाही, तसाच तो दिसायलाही सुंदर असला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर अंकिता यांनी केकच्या फायनल टचअपचे आठ दिवसांचे पुण्यात प्रशिक्षण घेतले.  

- अंकिता यांनी एका घरातुन सुरु केलेला उद्योग आता एमआयडीसीच्या मोठ्या जागेत सुरु आहे. येथे सात जणांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्याकडे 2 महिला आणि 5 पुरुष कर्मचारी काम करतात.    

 

पुढील स्लाइडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...