आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणावर एन-9 च्या उद्यानात चाकूने वार, खुनाचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जुन्या वादातून अट्टल गुन्हेगाराने एका तरुणाला उद्यानात बोलावून चाकूने वार करत खुनाचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एन-९ मधील रायगडनगरमधील उद्यानात हा घडला. याप्रकरणी सागर बिडवे (रा. एन-७) याच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार, सागरचा लहान भाऊ आकाश हा गुरुवारी सायंकाळी उद्यानाजवळून जात होता. या वेळी प्रमुख आरोपी अमोल घुगे (रा. शिवनेरी कॉलनी) त्याच्या दोन मित्रांनी त्याला अडवून शिवीगाळ केली.

 

या वेळी आकाशने त्याला शिवीगाळ करू नको, असे म्हणताच अमोेल घुगे याने चाकू काढून आकाश याच्या छातीच्या डाव्या बाजूला वार केले. यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...