महापालिकेच्या स्वच्छतादूतपदी नवेली देशमुख नियुक्त
औरंगाबाद- महापालिकेच्या स्वच्छतादूतपदी मिस दिवा इंडिया स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलेल्या नवेली देशमुखची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ च्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी ही नियुक्ती असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी नवेली यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ही नियुक्ती म्हणजे बहुमान असून या निमित्ताने औरंगाबादकरांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरुकता आणण्यासाठी पुढाकार घेऊ, असे नवेलीने सांगितले.