आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- प्रोझोन मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटमधील पीडित थायलंडच्या नऊ मुलींची गुरुवारी पहाटे मोठ्या फौजफाट्यात मुंबईला रवानगी करण्यात आली. तेथे त्यांना थायलंडच्या दूतावासाच्या सुपूर्द करण्यात आले. रात्री उशिरा त्या थायलंडला विमानाने रवाना झाल्या. त्या रवाना होताच गुन्हे शाखा थाई दूतावास भारत विदेशी विभागाला त्या नऊ मुलींना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी पत्र देणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना भारतात येण्यास कायमस्वरूपी बंदी राहील.
डिसेंबर रोजी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दोन पथकासह मॉलमधील स्पा सेंटरवर छापा टाकला होता. या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू होते. या प्रकरणात थायलंडच्या नऊ मुलींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली होती. न्यायालयाने चौकशी पूर्ण झाली असेल तर या मुलींना थायलंडला पाठवण्याची परवानगी दिली होती. गुरुवारी पहाटे या नऊ मुलींना घेऊन महिला पोलिस निरीक्षक राजश्री आडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, विजयानंद गवळी तसेच चार महिला पोलिस कर्मचारी मुंबईला रवाना झाले. मुंबईवरून थायी दूतावास त्यांच्या खर्चाने मुलींना थायलंडला पाठवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.