आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अॅपवर मनपाची मदार, प्रत्येक कर्मचाऱ्यास 10 ‘डाऊनलोड’चे टार्गेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुढील महिन्यात देशभर स्वच्छ भारत सर्वेक्षण होणार आहे. आपल्या शहराचा पहिल्या २५० शहरांमध्ये समावेश झाला नव्हता. यंदा कोणतेच चांगले उपक्रम राबवता मनपा प्रशासनाने केवळ स्वच्छता अॅपच्या भरवशावर पहिल्या २० शहरांच्या यादीत आपला नंबर लागणार असल्याची आशा आहे. स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला असून मनपाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान दहा जणांना हे अॅप डाऊनलोड करायला लावण्याचे उद्दिष्टे देण्यात आले असल्याचे समोर आले. 


स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने बुधवारी मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मनपा अधिकाऱ्यांची पूर्वतयारीची बैठक झाली. या बैठकीत वरील निर्णय झाल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतल्याचेही महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. महापौर म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या वीस शहरांत येण्यासाठी औरंगाबाद पालिका प्रयत्न करत आहे. पालिकेने स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी शहरात सात स्वच्छतादूत नेमले आहे. या कामात उद्योजकांसह औद्योगिक संस्थांनाही पालिकेने सहभागी करून घेतले आहे.

 

पालिकेच्या या पॅटर्नचे मुख्यमंत्र्यांनी व्हीसीदरम्यान कौतुक केले. तसेच हा पॅटर्न राज्यभरातील शहरांना राबवण्याचेही सूचित केले. भालसिंग म्हणाले की, स्वच्छता अॅप डाऊनलोड करून नागरिकांनी त्यावर तक्रारी पाठवले आवश्यक आहे. या तक्रारींचा निपटारा करून त्याचे फोटो शासनाच्या स्वच्छता अॅपवर पाठवावे लागणार आहे, असे झाले तरच त्यात पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात गुण मिळतील. त्यामुळे प्रत्येक पालिका कर्मचाऱ्याला किमान १० नागरिकांकडून अॅप डाऊनलोड करून घेण्याचे टार्गेट दिले. पालिकेकडे दोन हजार ५०० अधिकारी, कर्मचारी आहेत. याप्रमाणे २५ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्यास एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाचे टार्गेट पूर्ण होणार आहे. जानेवारी महिन्यात सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक येणार असून अद्याप तारीख ठरली नसल्याचे ते म्हणाले.


सर्वेक्षणात केवळ अॅपवर भर 
स्वच्छसर्वेक्षणात स्वच्छतेशी निगडित बारीकसारीक बाबींवर गुण दिले जाणार आहेत. यात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा संकलन, शहर पाणंदमुक्त करणे, नवीन उपक्रम आणि प्रयोग, स्वच्छता अ‍ॅप, नागरिकांचा सहभाग, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न या प्रमुख मुद्द्यांवर गुण दिले जाणार आहे. असे असले तरी मनपाकडून केवळ अॅपवर भर दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...