आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारखेडा परिसरात सात दुकाने फोडली; पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांचा उच्छाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विभागीय क्रीडा संकुल रस्त्यावरील अथर्व प्लाझामधील फोडलेले शटर. - Divya Marathi
विभागीय क्रीडा संकुल रस्त्यावरील अथर्व प्लाझामधील फोडलेले शटर.

औरंगाबाद- जवाहरनगर, पुंडलिकनगर गुरुसहानीनगरमध्ये मंगळवारी रात्री सहा दुकाने एक घर फोडायला चोवीस तास उलटत नाहीत तोच बुधवारी मध्यरात्री चोरांनी पुन्हा उच्छाद मांडत सात दुकाने फोडून पोलिसांना थेट आव्हान दिले. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच दुकाने फोडली जात असल्याने पोलिस ठाण्यांकडून रोज होत असलेल्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत अाहे. 


मंगळवारी मध्यरात्री शिवाजीनगर जवाहरनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सहा दुकाने एक घर फोडून चोरांनी हजारोंचा ऐवज लुटून नेला होता. बुधवारी मध्यरात्री गजानन महाराज मंदिर ते विभागीय क्रीडा संकुल रस्त्यावरील तीन दुकाने विभागीय क्रीडा संकुलासमोरील तीन दुकाने फोडली. शहानूरमियां दर्गा चौकातील एक मोबाइल दुकानही फोडले. विभागीय क्रीडा संकुलसमोरील निसर्ग अपार्टमेंटमधील शिवाजी वैद्य यांचे संगणकाचे दुकान, अॅड. डी. एम. पिंगळे एलआयसीचे डोळस यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तिघांच्या दुकानातून नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. दरम्यान, या तिन्ही दुकान चोरी प्रकरणात पोलिस ठाण्यात नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. सूतगिरणी चौकात सय्यद अफजल अमीन सय्यद यांचे मोबाइल शॉपी फोडून चोरांनी हजार ९०० रुपयांचे मोबाइल चोरून नेले. २३ ते २७ डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. यादरम्यान दुकान बंद होते. चोरांनी शटरचा पत्रा वाकवून आतील सर्व मोबाइल लंपास केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे


पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दुकाने
गजानन मंदिराकडून सूतगिरणी चौकाकडे जाताना लागणाऱ्या अथर्व प्लाझा आणि कासलीवाल सुवर्ण योग इमारतीतील तीन दुकाने चोरांनी फोडली. यात स्वाती फुटाणे यांचे मुक्ता बुटीक, निश्चल शेंडे आणि अशोक देशपांडे यांचे टेम्पलस इन्फोटेकचा समावेश आहे. मुक्ता बुटीकमधून चोरांनी लॅपटॉप चोरून नेला, तर टेम्पलस इन्फोटेकमधून लॅपटॉप भेटलेला असतानाही त्याची बॅग बाहेर फेकून लॅपटॉप तसाच ठेवला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद केली नव्हती. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेच्या पथकाने दोन्ही घटनास्थळांची पाहणी केली. 


पद्धत एकच, नाजूक शटर टार्गेटवर 
रामायणाकल्चरल हॉलखाली असलेले आइस्क्रीम पार्लर, शिवाजीनगरची सहा दुकाने बुधवारच्या दुकानफोडीची पद्धत एकच आहे. नाजूक शटर टार्गेट करून शटरच्या मधोमध गज घातला गेला आहे. त्यानंतर टॉमीच्या साहाय्याने लहान मुलगा आत जाईल इतके शटरवरच्या बाजूला वाकवले जाते. यात कुलूपही तोडले जात नाही. 


ही घ्या काळजी 
- शटरच्या खालच्या बाजूला जाड लोखंडाची पट्टी बसवा. 
- शटरच्या दोन्ही कोपऱ्याच्या कुलपासह मध्यभागीही एक सेंट्रल लॉक लावा. 
- शटरच्या दोन्ही उभ्या बाजू लोखंडी पट्टीने ठोकून घ्या. 
- चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...