आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

105 कोटींचा आराखडा उच्चाधिकार समितीसमोर; दि. 14 रोजी बैठकीत सादर होणार बजेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ- येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा १०५ कोटी ५० लाखांचा आराखडा आज दि. १४ फेब्रुवारी रोजी उच्चाधिकार समितीसमोर सादर केला जाणार आहे. 


  यंदाच्या बजेटमध्ये या विकास आराखड्यास निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात व्हावी अशी अपेक्षा भाविक, देवस्थान ट्रस्ट, व्यावसायिक, ग्रामस्थ करीत आहेत. 
    घृष्णेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा संबधित विभागामार्फत राज्याचे वने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार प्रशांत बंब यांच्या विशेष  मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग २११ लगत ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या येळगंगा नदीकाठी असलेल्या गट क्र. ४ मध्ये १०५ कोटी ५० लाखांचा हा विकास आराखडा बनविला आहे.  या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्यकारिणी समिती, पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा समितीने या आराखड्यास यापूर्वी मंजुरी दिली आहे. आता १४ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात राज्यांचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर हा आराखडा मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या शिखर समितीसमोर मांडला जाईल व शिखर समितीच्या मान्यतेनंतर या आराखड्यास प्रत्यक्ष निधी मिळेल परिणामी  आराखडा येथे प्रत्यक्ष साकारला गेला तर भाविकांसह व्यावसायिक यांना लाभ होईल. 

 

यांच्या उपस्थितीमध्ये होणार उच्चाधिकार समितीची बैठक   

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज दि. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या घृष्णेश्वर विकास आराखड्याच्या बैठकीस अपर मुख्य सचिव वित्त, नियोजन व बांधकाम, प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता, प्रधान सचिव पर्यटन, प्रधान सचिव ऊर्जा, सचिव (वने) महसूल व वनविभाग, सचिव ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, प्रदीप देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती बैठकीत राहिल. 

 

विकासाचे ६३ कोटी व १०५ कोटी दोन्ही आराखडे सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’त    
घृष्णेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासाकरिता पहिल्यांदा ६३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्या वेळी दैनिक दिव्य मराठीने २९ जून २०१६ रोजी हा आराखडा सर्वप्रथम आपल्या वाचकांसमोर मांडला होता. यानंतर या विकासाकरिता वेळोवेळी होणाऱ्या बैठका व बदल तसेच आता हा आराखडा १०५.५  कोटींचा बनत अंतिम टप्प्यात उच्चाधिकार समितीसमोर असताना पुन्हा हा आराखडा आता दैनिक दिव्य मराठी सर्वप्रथम वाचकांसमोर मांडत आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भक्तनिवास आणि वाहनतळ...

 

बातम्या आणखी आहेत...