बारा वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता, अपहरण झाल्याची तक्रार
औरंगाबाद- पाटोदा गावातील बारा वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली असून तिचे अपहरण झाल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. कोमल हिरामण मोरे असे तिचे नाव असून ती इयत्ता सहावीत शिकते. तिची आई रुख्मिणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता त्या घरी आल्या तेव्हा मुलगी घरात नव्हती. तिच्या वडिलांनी गावात शोध घेतला. परंतु ती न सापडल्याने मोरे दांपत्याने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.