आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 कोटींच्या निविदा पुन्हा मागवण्याच्या हालचाली; तक्रारीनंतर निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- १५० कोटींच्या रस्त्यांसाठी मागवण्यात आलेल्या निविदा एकाच कंपनीला दिल्या जाणार हे स्पष्ट होत असतानाच या विरोधात आलेल्या तक्रारींत तथ्य असून त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर नव्याने टेंडर मागवण्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 


आलेल्या निविदांची तांत्रिक तपासणी सुरू आहे, ती पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याचा अभ्यास करून निविदा पुन्हा मागवायच्या की वैध ठरणाऱ्या ठेकेदाराला काम द्यायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे मुगळीकर यांनी सांगितले. जे. पी. इंटरप्रायजेस या ठेकेदार संस्थेला हे काम मिळणार स्पष्ट होत आहे. या कंपनीने सहा निविदांसाठी सुरक्षा रकमेचे सहा धनादेश देण्याऐवजी एकच धनादेश दिला. शपथपत्र स्टँप पेपरवर देण्याऐवजी लेटरहेडवर दिल्याच्या तक्रारी आहेत. 


'एटी अँड टी', 'बिर्ला', आयआरबीला काम द्या 
निविदेला काही ठेकेदार आक्षेप घेत आहेत. यामुळे या निविदा नव्याने बोलवाव्यात. रस्ते उच्च दर्जाचे व्हावेत यासाठी एटी अँड टी, बिर्ला, आयआरबीसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थांना पाचारण करावे, अशी मागणी माजी उपमहापौर संजय जोशी यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...