आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींच्या 5 बजेटमधून मध्यमवर्गाला 2.5 लाखांच्या सवलती;40 हजारांचे स्टँडर्ड डिडक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आजवर संसदेत सादर झालेल्या पाच केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला चांगल्या कर सवलती मिळाल्या आहेत. यंदा फक्त ४० हजारांचे स्टँडर्ड डिडक्शन दिले असले तरी यापूर्वीच्या चार अर्थ संकल्पात अर्थमंत्री जेटली यांनी विविध रूपाने किमान २ लाख रुपयांच्या सवलती दिल्याचे स्पष्ट होते.  


नाशिक येथील सेबी प्रमाणित गुंतवणूक सल्लागार विश्वनाथ बोदडे यांनी सांगितले, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात प्राप्तिकर उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवरून २.५ लाख रुपये करण्यात आली. त्याच वेळी प्राप्तिकर कायद्याच्या ८० सी कलमाअंतर्गत गुंतवणुकीची मर्यादा एक लाख रुपयांवरून १.५ लाख रुपये करण्यात आली. त्यानंतरच्या म्हणजे २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री जेटली यांनी गृहकर्जाच्या परतफेडीवरील वजावटीची रक्कम ५० हजार रुपयांनी वाढवून २ लाख रुपये केली. तसेच प्रथमच नवे घर घेणाऱ्यांना त्यांनी ३५ लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज घेतले असल्यास आणि घराचे बाजारमूल्य ५० लाखांपेक्षा कमी असल्यास ५० हजार रुपये उत्पन्नातून वजावटीची तरतूद केली. तर मागील आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये २.५ ते ५ लाख रुपये उत्पन्न गटाचा कर दर १० टक्क्यांवरून ५ टक्के केला. 


यंदा ४० हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन सुरू केले आहे. अशा रीतीने आजवरच्या पाच अर्थसंकल्पातून किमान २.५ लाख रुपयांच्या सवलती मध्यमवर्गाला मिळाल्या आहेत.

 

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आता २.९ लाख रुपये
यंदाच्या बजेटमध्ये ४० हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आगामी आर्थिक वर्षात प्राप्तिकर वजावटीसाठी मेडिकल बिले सादर करण्याची  तसेच करमुक्त ट्रान्सपोर्ट भत्ता प्रतिमाह १६०० रुपये (१९,२०० रुपये वार्षिक)यासाठी पगारदार, निवृत्तिवेतनधारकांना कसलाही पुरावा सादर करण्याची गरज नाही, असे वित्त सचिव हसमुख आधिया यांनी स्पष्ट केले. अशारीतीने स्टँडर्ड डिडक्शनच्या रूपाने अाम्ही करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखावरून २.९० लाख रुपये केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, प्राप्तिकर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेल्या सवलती...

बातम्या आणखी आहेत...