आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने न देणाऱ्या सावकार महिलेस 3 वर्षे सक्तमजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- व्याजासह पैसे परत केल्यानंतर दागिने परत न करणाऱ्या सावकार महिलेस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेस महिलेने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्यासमोर अपील दाखल केले असता न्यायालयाने तिची शिक्षा कायम ठेवली. 


ख्वाजा युसूफ महंमद हुसेन (शहानगर, बीड बायपास) याने १७ ऑक्टोबर २००९ मध्ये आमेरनगरातील सावकार बानोबी नईम खान पठाण हिच्याकडून ४० हजार रुपये व्याजाने घेतले होते. पैसे देताना तिने सोन्याचे दागिने गहाण ठेवून घेतले होते. दरम्यान, हुसेन याने व्याजाच्या रकमेसह ४० हजार रुपये परत केले. त्यानंतर सोन्याचे दागिने व बाँड पेपर मागितले असता बानोबी हिने टाळाटाळ केली. या प्रकरणी तिच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी तिला दोषी ठरवूने तीन वर्षे सक्तमजुरी, नुकसान भरपाईपोटी दोन लाख रुपये, नुकसान भरपाई न दिल्यास ६ महिने शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात बानोबीने अपील दाखल केले. त्यावर मंगळवारी अंतिम सुनावणी झाली असता सहायक लोक अभियोक्ता अजित अंकुश यांनी शिक्षा कायम ठेवावी असा युक्तिवाद केला. 

बातम्या आणखी आहेत...