आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअाैरंगाबाद- ३५ प्रवाशांना घेऊन पुण्याहून रविवारी सकाळी ८.३० वाजता निघालेल्या पुणे-आैरंगाबाद एशियाड बसला रांजणगाव आैद्योगिक वसाहतीजवळ अपघात झाला. चाैफुलीवर अचानक महामार्गावर घुसलेल्या कंटेनरवर ही बस धडकल्याने त्यातील ३० प्रवासी जखमी झाले. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना शिरूर येथील रुग्णालयात नेण्यात अाले.
रविवारी सकाळी पुणे-अाैरंगाबाद (एमएच २० बीएल ३८०९) ही विनाथांबा बस निघाली हाेती. रांजणगावजवळ या बसची अचानक मध्ये अालेल्या कंटेनरला पाठीमागून धडक बसली. यात ३० प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महिला व बालकांचाही समावेश हाेता. बसचालकाच्या दाेन्ही पायांना मार लागला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर प्रथमाेपचार करण्यासाठी बसमध्ये प्रथमाेपचार पेटीही नसल्याची प्रवाशांची तक्रार अाहे. १०८ रुग्णवाहिकेमधून गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्यात अाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.