आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी स्वच्छतागृह वापरू देणाऱ्यांना मालमत्ता करात 5 टक्के सवलतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता घाेगरे - Divya Marathi
स्मिता घाेगरे

औरंगाबाद- अनेक तास घराबाहेर राहावे लागणाऱ्या महिलांसाठी आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे स्वच्छतागृह वापरू देणाऱ्यांना त्या इमारतीच्या मालमत्ताकरात पाच टक्के सवलत देण्याचा माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आज एकमताने मंजूर केला. 'दिव्य मराठी'तर्फे अशा महिलांसाठी 'दरवाजा उघडा' अभियान राबवण्यात आले होते. त्यानंतर शहरातील अनेक व्यावसायिक आणि सामाजिक प्रतिष्ठानांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. 


व्यावसायिक अथवा सामाजिक संस्थांचे स्वच्छतागृह अशा पद््धतीने महिलांपुरते सार्वजनिक करणाऱ्याचा मोठे पणा दाखवणाऱ्या व्यक्ती एक प्रकारे महापालिकेचेच काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिकेने त्यांना मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी सूचनाही या अभियानाचा भाग म्हणून 'दिव्य मराठी' तर्फे करण्यात आली होती. त्याला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला. माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी 'दिव्य मराठी' ला धन्यवाद देत तसा प्रस्ताव लगेचच पालिकेकडे सादर केला होता. त्याला काल सर्व महिला आणि पुरुष नगरसेवकांनीही एकमताने मान्यता दिली. 


महिलांच्या मागणीला निर्विवाद संमती 
- शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत स्मिता घोगरे यांचा हा प्रस्ताव सभेसमोर आला. या प्रस्तावाला माधुरी अदवंत, अंकिता विधाते, सीमा खरात यांनी अनुमोदन दिले होते. 
- कर रचनेशी संबंधित असल्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. 
- शासनकार्यात लोकसहभागाचा हा सकारात्मक विचार असल्याने राज्य सरकारकडूनही याला संमती मिळू शकते. 
- राज्य शासनाने मंजुरीची मोहोर उठवल्यावर महापालिका ही करसवलत देऊ शकेल, असे सांगण्यात आले. 


प्रोत्साहन आवश्यकच 
सामाजिक जबाबदारी म्हणून 'दिव्य मराठी'ने हे अभियान राबवले. महिलांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देणाऱ्या व्यापारी, सामाजिक संस्था, हाॅटेल्सचालकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी अशा प्रतिष्ठानांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत देणे महत्त्वाचे आहे. (१८ डिसंेबर २०१७ रोजी महापालिकेत सादर केलेल्या प्रस्तावातून) 

बातम्या आणखी आहेत...