आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पाच जिल्ह्यांना मिळाली 1214 कोटी 57 लाख विमा भरपाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात २३०० कोटींच्या वर विमा नुकसान भरपाई जाहीर झाली असून मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला विमा संरक्षण कवच मधून १२१४ कोटी ५७ लाख रुपये भरपाई मिळाली आहे. याचा सुमारे ४४ लाख ६१ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मात्र, जालना, लातूर व हिंगोलीची विमा भरपाई शून्य दाखवली आहे. यामुळे १९.३८ लाख शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहणार का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

 

अवर्षण, पावसातील खंड, कीड व रोगाचा प्रादुर्भाव, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, आग लागणे, गारपीट, शेत जलमय होणे किंवा पाणी साचून, पुराच्या पाण्यात वाहून होणारे नुकसान, दुष्काळ, दूषित हवामान, काढणीस आलेले व काढून ठेवलेल्या पिकांवर नैसर्गिक आपत्ती कोसळणे, अवकाळी पाऊस आदी आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एप्रिल २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत समाधानकारक नुकसान भरपाई मिळत असल्याने पीक विमा घेण्याचा कल वाढत चालला आहे. गत खरीप हंगामात राज्यातील ८२ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण कवच घेतले आहे. त्यात मराठवाड्यातील ६४ लाख ३ हजार ४८५ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी औरंगाबाद १५७ कोटी ९५ लाख, बीड २६३ कोटी ३७ लाख, उस्मानाबाद २३३ कोटी २६ लाख, मरावाड्यात आणि नांदेड जिल्ह्याला ४५३ कोटी ८८ लाख रुपये सर्वाधिक विमान नुकसान भरपाई मिळाली आहे. तर परभणी सर्वात कमी १०६ कोटी ११ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप पेरणी, मुला मुलींचे लग्न असो किंवा शाळेचे प्रवेश आदी कामांसाठी विमा संरक्षण कवच उपयुक्त ठरणार असल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

रोगांचा प्रादुर्भाव आणि बोंडअळी
मराठवाड्यात गत वर्षी सरासरी पेक्षा १५ टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद कृषी, महसूल विभागाने घेतली आहे. तसेच पावसाचे खंड अधिक राहिले असून त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग, तूर, तीळ, कापूस, मका आदी पिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाल्याचे अहवाल राज्य कृषी विभाग व शासनाला पाठवले आहेत. विशेष म्हणजे कीड व रोगाच्या प्रादुर्भाव आणि बोंडअळीच्या हल्ल्यामुळे नुकसानीत आणखी भर पडल्याचा वेगळा अहवाल पाठवला होता. त्यात ५ ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे म्हटले होते. जिल्हानिहाय झालेल्या पिकांचे नुकसान लक्षात घेऊन२१४ कोटींची विमा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...