आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पा सेंटरचे दिवसाचे उत्पन्न 8 लाख रुपये; छाप्यात पोलिसांना आढळले परदेशी चलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे दिवसाचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षाही जास्त असल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी पोलिसांनी प्रोझोन मॉलमधील दोन स्पा सेंटरवर छापा टाकून थायलंडच्या बारा मुलींसह स्पा सेंटरचे व्यवस्थापक, ग्राहकांना ताब्यात घेतले होते. 


प्रोझोन मॉलमध्ये फॅमिली स्पा सेंटरच्या नावाखाली विदेशी मुलींचा सहभाग असलेले मोठे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी सापळा रचला होता. चार अयशस्वी सापळ्यांनंतर गुरुवारी सापळा यशस्वी झाला. हे दोन्ही स्पा सेंटर मुंबईच्या डेरिक मचदो आणि फैजल शेख यांच्या मालकीचे आहेत. दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार असून या सेक्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास सुरू असल्याचे उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. 


छापा मारल्यानंतर पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले. यात लाख रुपये रोख रक्कम सापडली. हे आठ लाख रुपये हे केवळ गुरुवारचे उत्पन्न होते. त्यात विदेशी चलनही मिळाले. दरम्यान, सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


पाच बेडरूमचा अालिशान फ्लॅट 
पोलिसांनी अटक केलेल्या थायलंडच्या मुली मागील अनेक दिवसांपासून शहरात टुरिस्ट पासपोर्टवर वास्तव्यास आहेत. त्या एन-१ परिसरातील पाच बेडरूमच्या अालिशान फ्लॅटमध्ये राहत होत्या. परंतु टुरिस्ट पासपोर्टवर कर्मचारी म्हणून त्यांनी काम करणे अवैध आहे. त्यांना सी फॉर्म भरणेही अनिवार्य असते. फ्लॅट मालकाने त्यांच्याकडे विदेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना दिली नव्हती. शशांक तेथेच राहायचा. 

बातम्या आणखी आहेत...