आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्मार्ट\' उधळपट्टी सुरूच: महापुराचा महिमा असणाऱ्या गाेदाकिनारी अाता ८०० वृक्ष लावण्याचा घाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकच्या गावठाणाला स्मार्ट करणे अशक्य असल्याचे लक्षात अाल्यानंतर स्मार्ट सिटीतील हजार काेटीपैकी निम्मा निधी महापुरामुळे धाेकेदायक ठरणाऱ्या गाेदावरीच्या नावाखाली खर्च करण्याचा सपाटा सुरू करण्यात अाला अाहे. पुराची तीव्रता कमी करणे, किंबहुना गाेदावरीचे रुपडे पालटण्यासाठी १७ लाख रुपये खर्चून ८०० वृक्ष लावण्याची तयारी सुरू केली अाहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराचे प्रमुख अाकर्षण ठरेल अशा सीएसअार अॅक्टिव्हिटीतून उभारलेला गाेदा पार्क गाेदावरीच्या ज्या महापुराने काही तासात उद‌््ध्वस्त झाला तेथे या वृक्षांची गत काय हाेणार व अशा वृक्षांची लागवड करताना गरज, तांत्रिक व्यवहार्यता याबाबत अाग्रही असणाऱ्या अायुक्त तुकाराम मुंढे यांनी कशी हरकत घेतली नाही, असे प्रश्न उपस्थित हाेत अाहेत. 


केंद्र शासनाच्या दुसऱ्या फेरीत नाशिकची स्मार्ट सिटीत निवड झाली. मुख्य म्हणजे, निवड झाल्यानंतर महापालिकेचा अाराखडा २४०० काेटी रुपयांचा हाेता. त्यापैकी केंद्र शासनाकडून पाच वर्षांत पाचशे काेटी तर राज्य शासनाकडून २५० काेटी इतका हिस्सा मिळणार हाेता. यात महापालिकेला मूळ हिश्श्यातील २५० काेटी साेडून उर्वरित कामे करायची असल्यास जवळपास १४०० काेटींची उभारणी करायची हाेती. या याेजनेत गावठाण पुनर्विकास, हरित क्षेत्र विकास व पॅनसिटी अंतर्गत छाेटी कामे करणे महत्त्वपूर्ण हाेते. गावठाणात प्रामुख्याने दाटीवाटीतील घरे हा मुद्दा अग्रभागी असल्यामुळे येथे क्लस्टरच्या माध्यमातून चार एफएसअाय देत घरांचा पुनर्विकास करून गावठाण स्मार्ट बनवणे हा प्रमुख उद्देश हाेता. मात्र, वाढीव एफएसअाय, घर मालकीचे वाद यामुळे जागेच्या उपलब्धतेअभावी स्मार्ट गावठाणाला फाटा देत येथे फक्त २४ तास पाणीपुरवठा, काँक्रीट वा डांबरी रस्ते अशाच प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित झाले. त्यातून गावठाण स्मार्ट झाले असे दिसत नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरी उगम पावणारी मात्र गावठाणामधून जाणारी गाेदावरी स्मार्ट करण्याची शक्कल लढवली गेली. या ठिकाणी थाेडेथाेडके नसून ५०० काेटी रुपयांची कामे प्रस्तावित अाहेत. त्यातील जवळपास दाेनशे काेटींची कामे पहिल्या टप्प्यात सुरू हाेणार अाहे. त्यात भरीसभर म्हणून अाता गाेदावरीत दहा फुटांपेक्षा अधिक उंचीचे ८०० वृक्ष लावण्याचा निर्णय घेण्यात अाला असून त्यासाठी चाचपणी सुरू अाहे. मात्र, मागील काही अनुभव बघता व ज्या अासाराम बापू पुलालगतच्या गाेदा पार्कबाबत लाेखंडी खांबापासून ते सिमेंटच्या वस्तूपर्यंत असे सर्व काही तासांत भग्न झाले, त्या महापुरात हे वृक्ष कसे तग धरतील असा प्रश्न अाहे. विशेष म्हणजे, महापूर हा काही वर्षांनी येताे, असे सांगत वेळ मारून नेली जात असली तरी, प्रत्यक्षात बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा, संकुचित झालेले गाेदापात्र, परिसरातील अतिक्रमणे, पावसाळी गटारातून शहरातील पाणी थेट नदीत येत असल्यामुळे पुराची तीव्रता वाढतच चालली अाहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्यावर्षी तर तब्बल सहावेळा गोदावरीला पूर अाला. 


मुर्तडकांनी लावलेले पाम वृक्ष गेले वाहून 
रामवाडी येथील गाेदा पार्कलगत नऊ फूट उंचीची माेठी नारळासारखी दिसणारी परंतु पामची झाडे खासगी विकसकाच्या मदतीने तत्कालीन महापाैर अशाेक मुर्तडक यांनी लावली हाेती. राज ठाकरे यांनी त्याची पाहणी करीत काैतुकही केले हाेते. दरम्यान, महापुरात काही तासांतच ही झाडे भुईसपाट झाल्याचे उदाहरण ताजे अाहे. 


असे जाणार ५१० काेटी गाेदावरीत 
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ५१२ कोटींचा 'प्रोजेक्ट गोदा' हा प्रकल्प असून, त्यात गावठाण पुनर्विकास अर्थातच रेट्रो फिटिंग अंतर्गत १८ कामांची दोन पॅकेजेस आहेत. पहिल्या पॅकेजमध्ये गोदाघाटाचे सौंदर्यीकरण केले जाणार असून, त्यात गोदाघाटाला पौराणिक लूक देण्यासाठी दगडी पेव्हर ब्लॉक, दगडी बेंच, सायकल ट्रॅक, पदपथ, नामफलक, आकर्षक कारंजे बसवले जातील. दुसऱ्या पॅकेज अंतर्गत नदी स्वच्छता, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील बंधाऱ्यांच्या गेटवर स्वयंचलित यांत्रिकी दरवाजे, हनुमान घाट ते रामवाडीदरम्यान पूल, चिंचबन ते हनुमानवाडी पादचारी पूल, तसेच अरुणा व वाघाडी नदीसाठी वळणघाट आदी १८ कामे हाेतील. 

 

बातम्या आणखी आहेत...