आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील शौचालयांचे 835 कोटी 61 लाख रुपये राज्य शासनाकडे तुंबले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद- मराठवाड्यात स्वच्छ  भारत मिशन अंतर्गत ६१९६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र लोकांनी शौचालय बांधल्यानंतर त्यांना अजून त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे  ८३५ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी देण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे  लोक स्वच्छ भारत साठी पुढाकार घेत असतांना त्यांना निधीसाठी  मात्र प्रतिक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे.  


मराठवाड्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी  त्यासाठी जिल्हावाईज ग्रामसेवक बीडीओच्या  बैठका देखील घेतल्या.यामध्ये एस.सी,एसटी, अल्पभुधारक विधवा आणि परितक्ता महिला,अपंग लाभार्थी,महिला कुटुंब प्रमुख असलेल्यासाठी १२ हजार रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.  


मराठवाड्यात ६१९६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त  : मराठवाड्यात ६६१९ ग्रामपंचायतीपैकी ६१९६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. या अंतर्गत आत्तापर्यत ९३ टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये  सर्वाधिक २०१७-१८ मध्ये  ४४०५ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत.यामध्ये औरंगाबाद ६८६ (८०.२३ टक्के),बीड १०१९(१००),हिंगोली ५६३ (१००)जालना ७७४(१००)लातूर ७८२ (९९.८७) उस्मानाबाद ६१९ आणि परभणी ६११ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये शौचालयाचे फोटो अपलोड   केलेला प्रमाण हे ६८.२१ टक्के इतके आहे. तर एकुण हगणदारीमुक्त झालेल्यापैकी केवळ ३७ टक्के ग्रामपंचायतीचे  व्हेरीफिकेशन करण्यात आले आहे.याबाबत केंद्रीय पातळीवरच्या पथकाकडून तपासणी करण्यात येते.  

 

मराठवाड्यात वितरित झाले ४६४ कोटी   

मराठवाड्यात आत्तापर्यंत ४६४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ४०८ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी सर्वाधिक  १७० कोटींचा निधी हवा आहे. याबाबत  औरंगाबााद हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यात शौचालयासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे अडचण होत असल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये बीड १४६ कोटी उस्मानाबाद १२१ कोटींचा निधी हवा आहे.  

 

अनुदानाच्या निधीचा प्रस्ताव पाठवला  
या वर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्याची गती खूप वाढली आहे. यामध्ये नागरिकांना १२ हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. आतापर्यंत ६१९६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाली आहेत.त्यामुळे निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.  
- सूर्यकांत हजारे, उपायुक्त, औरंगाबाद

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जिल्हानिहाय निधी...

बातम्या आणखी आहेत...