आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांच्या उपस्थितीत कर्नल सावंतांचा ‘आप’ प्रवेश;12 जानेवारीला कार्यक्रम: प्रीती मेनन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद- सिंदखेडराजा येथे आम आदमी पार्टीच्या वतीने १२ जानेवारीला महाराष्ट्र संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद  केजरीवाल यांच्या उपस्थितीत कर्नल सुधीर सावंत आपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती  मेनन यांनी   पत्रकार परिषदेत दिली.  


सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे स्थानिक पोलिस यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी या सभेस परवानगी नाकारली होती. त्यामुळे दोन स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे ही परवानगी देण्यात आल्याचे मेनन यांनी सांगितले. या वेळी राज्याचे प्रभारी पंकज गुप्ता यांची उपस्थिती होती. मेनन म्हणाल्या, राज्यात वर्षभरात शेती  आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. विविध समाजांतील असंतोषाला मोठ्या जनमोर्चांनी वाचा फोडली आहे. शेती  आणि शेतमालाचे प्रश्न पुढे येत असून भाजप सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरले आहे. तर निष्क्रिय काँग्रेस आणि तडजोडीचे राजकारण करणाऱ्या  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमुळे प्रस्थापित पक्षांकडून अपेक्षाभंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी  राज्यात सक्रिय होणार आहे. 


दरम्यान,  याआधी राज्यात आपला म्हणावे तसे यश मिळाले नाही.  त्यामुळे केजरीवाल आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे आपसह राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले   आहे.

 

काम आवडल्यामुळे आपमध्ये : सावंत  
दिल्लीत फिरल्यानंतर बजेटमधील २६ टक्के हिस्सा शिक्षणावर  पहिल्यांदाच खर्च झाला आहे.  सरकारी शाळांना त्यांनी पंचतारांकित केले आहे. लोक  खासगी शाळा सोडून सरकारी शाळेत जात आहेत. आरोग्यावरही १३ टक्के खर्च आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध एक आदर्श सरकार काम करत असल्याचे पाहूनच या पक्षात सहभागी होत असल्याचे  सुधीर सावंत यांनी सांगितले. १२ जानेवारीला जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सर्व समर्थकांसोबत प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.

 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काय म्हणाल्या प्रिती मेनन...

बातम्या आणखी आहेत...