आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंुड जोशी हत्या प्रकरणातील आरोपी सय्यद जुनैद सय्यद इनायत निर्दाेष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर-  वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये गुन्हेगारी साम्राज्यात गुंडगिरीची दहशत पसरवणाऱ्या कुप्रसिद्ध गुंड योगेश जोशी हत्या प्रकरणातील आरोपी सय्यद जुनैद सय्यद इनायत (रा. वाळूज, ता. गंगापूर) याची वैजापूरच्या जिल्हा अपर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.   
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी मंगळवारी (५ डिसेंबर) या बहुचर्चित प्रकरणाचा  निकाल दिला. वाळूज एमआयडीसी परिसरात नामचीन गुंड म्हणून योगेश जोशी कुख्यात होता. सय्यद जुनैद सय्यद इनायत व योगेश जोशी यांच्यात एक डिसेंबर २०१२ रोजी वाळूज परिसरातील अहमदनगर रस्त्यावरील हॉटेल दावतसमोर रात्री दहा वाजता वाद झाला होता. या वादात जुनैद यांनी योगेश जोशीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर  वाळूज पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश रणवीरकर यांच्या फिर्यादीवरून सय्यद जुनैद याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.   


या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी केला. गंगापूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पण खुनाचा गुन्हा सत्र न्यायालयात चालवला जात असल्याने हे प्रकरण वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग केले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...