आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीतले प्लास्टिक वापरणाऱ्यांवर परवापासून कारवाई, शहरात १० पथके तैनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद शहरात २४ जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मोहिम राबवण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. त्यासाठी मनपाने दहा पथके तयार केली असून, सुरुवातीला उत्पादक आणि वितरकांवर कारवाई होणार आहे. 


बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक वस्तू वापरणाऱ्यांवर दंड आकारण्यासाठी कायद्याची चाचपणी करण्यात येते आहे. मोहीम सुरु होईपर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत नेमका िकती दंड आकारायचा हे निश्चित करण्यात येणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. राज्य सरकारने मार्च महिन्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. मात्र, विक्रेत्यांकडील माल विकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. ही मुदत २३ जून रोजी संपत आहे. त्यामुळे २४ जूनपासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. महापौरांनी सांगितले की, शहरातील एकूण कचऱ्यामध्ये प्लास्टीकचे प्रमाण तब्बल ३० टक्के आहे. शहर प्लास्टीकमुक्त झाल्यास कचऱ्याची समस्याही कमी होइल. यासाठी नागरिकांनीही मनपाला सहकार्य करावे. 

 

शनिवारपासून प्लास्टीक वापरणारे, विक्रेते व उत्पादक असे तिघेही दंडास पात्र ठरतील. नागरिकांनी सहकार्य केल्यास दंडाची गरज पडणार नाही. त्यासाठी जनजागृतीही केली जाईल. प्लास्टीकबंदीसाठी वॉर्ड स्तरावर प्रत्येकी एक या प्रमाणे नऊ आणि केंद्रीयस्तरावर एक अशी एकूण दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, किती मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी असेल, दंड किती आकारला जाईल, याचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांत बैठक होईल. 


मुंबई महापालिका क्षेत्रात पाच हजारांचा दंड 
मुंबई मनपाने २४ जूनपासून बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तू वापरणाऱ्यांना जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही जागेवरच तसा दंड करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद मनपाला मात्र दंड आकारण्यासाठी कायद्यातील तरतुदी पाहाण्याची गरज भासू लागली असून कारवाईची वेळ आल्यावर सुचलेली ही पश्चात बुद्धी आहे, असे दिसते.

बातम्या आणखी आहेत...