आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा उंच करण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना; लवकरच निविदा काढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ १९ फेब्रुवारीला करण्याचे नक्की झाल्यानंतर विविध खात्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याबरोबरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मनपा आयुक्तांना सर्वाधिकार प्रदान केले.

 
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी महापालिका काम करत नसेल तर ना हरकत प्रमाणपत्र द्या, आम्हीच काम करतो, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर महापालिकेचे डोळे उघडले अन् आम्हीच काम करतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर समितीने पुन्हा इशारा देत १९ फेब्रुवारीला भूमिपूजन झाले नाही तर आम्ही करणार असे सांगितले. तेव्हा महापालिकेने आपला मुहूर्त तोच केला. 

 

शुक्रवारी दुपारी जिल्हा शिवजयंती समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवजयंतीलाच कामाचे भूमिपूजन करण्याचे ठरले. सायंकाळी झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार यापुढील सर्व प्रक्रिया करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 


पुतळ्याची उंची ४० फुटांवर नेण्यासाठी येणाऱ्या खर्चालाही मान्यता देण्यात येईल, असाही प्रस्ताव या वेळी मंजूर झाला. आता आयुक्त मुगळीकर पुढील प्रक्रिया करतील. 

बातम्या आणखी आहेत...