आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज्तेमाला 2 दिवसांत परवानगी; आयोजकांचे प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगावात २४ ते २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शुक्रवारी आयोजकांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. प्राथमिक सोयीसुविधांची पूर्तता करून पोलिसांना त्याची माहिती दिल्यावर दाेन दिवसांमध्ये यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.


एवढ्या मोठ्या आयोजनाला ऐनवेळी बंदोबस्त देणे अशक्य असल्याचे सांगत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर लिंबेजळगावचे सरपंच, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, लातूर, मुंबईच्या इज्तेमाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने यादव यांची भेट घेतली. 


मांढरदेवी घटनेनंतर ठरले सुरक्षेचे निर्देश
२५ जानेवारी २००५ला मांढरदेवी यात्रेत चेंगराचेंगरीत २९१ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुठल्याही मोठ्या स्वरुपाच्या धार्मिक आयोजनाबाबत दिशानिर्देश  व अटी शर्ती ठरवणारा अध्यादेश शासनाने काढला होता. त्यानुसार पोलिसांनी आयोजकांना २१ मुद्दे दिले. त्याची पूर्तता करून २ दिवसांत माहिती पोलिसांना दिल्यानंतर परवानगीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...