आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रीच भिडे गुरूजींना पाठीशी घालत आहेत, एकबोटे, भिडेंकडून दिशाभूल; राजा ढालेंचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे दिशाभूल करत आहेत, जर ते दोषी नाहीत तर का लपत आहेत, असा प्रश्न ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आणि साहित्यिक राजा ढाले यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

 

औरंगाबाद येथे रमाई प्रकाशनच्या युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यावेली ते बोलत होते ते म्हणाले, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसारखी माणसे थापा मारत आहेत. भिडेची पीएचडी कुठल्या विषयात आहे ते चेक करा. या विषयांवर नाटकांची गरज आहे. त्यातून भाष्य होणे आवश्यक आहे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करण्याचा घाट घातला जातोय. हा देश भारत देश म्हणून ठेवायला हवा, त्या साठी प्रयत्न व्हावा. सरकार एका समाजाचे लांगूल चालन करत आहे. आज बसलेला मुख्यमंत्री संभाजी भिडे व इतर लोकांना पाठीशी घालतोय. हा विचार आजच्या ह्या कार्यक्रमातून घेऊन जा, विचार करा, असे ते म्हणाले. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...